Pakistan Shocker: मित्राच्या वडिलांशी लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीला दिली चप्पल चाटण्याची शिक्षा, केस कापले, भुवया छाटल्या (Watch Video)

पीडितेने सांगितले की, तिच्या मित्राचे वडील, जो कारखाना मालक आहे, तिला लग्नासाठी बळजबरी करत होता,

Pakistan Shocker: मित्राच्या वडिलांशी लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीला दिली चप्पल चाटण्याची शिक्षा, केस कापले, भुवया छाटल्या (Watch Video)
Pakistan Girl Made To Lick Shoes, Hair Chopped. (Photo Credits: Twitter)

पाकिस्तानातील फैसलाबाद येथून एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका तरुणीने एका मध्यमवयीन पुरुषाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिला चप्पल चाटण्यास भाग पाडण्यात आले. एवढेच नाही तर तिचे केस आणि भुवया छाटण्यात आल्या. या मुलीचा लैंगिक छळही करण्यात आला. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ बुधवारी समोर आला. व्हिडिओमध्ये मुलीवर अत्याचार होताना दिसत आहे.

पीडितेने सांगितले की, तिच्या मित्राचे वडील, जो कारखाना मालक आहे, तिला लग्नासाठी बळजबरी करत होता, मात्र तिने यासाठी नकार दिल्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या मित्राचे वडील आणि घरातील महिला कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement