Pakistan Airstrike on Iran: पाकिस्तानने इराणला दिलं प्रत्युत्तर; 7 ठिकाणी हवाई हल्ले करत सिस्तान बलुचिस्तान प्रांतातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि प्रशिक्षण शिबिरांना केल लक्ष्य
पाकिस्तानने इराणला बलुचिस्तान प्रांतातील सुन्नी दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.
Pakistan Airstrike on Iran: मंगळवारी इराणने पाकिस्तानात (Pakistan) क्षेपणास्त्र (Missile) डागून बलुच दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. आता पाकिस्तानने इराण (Iran) ला प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने इराणमध्ये सात ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानी क्षेपणास्त्रांनी इराणच्या सिस्तान बलुचिस्तान प्रांतातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने इराणला बलुचिस्तान प्रांतातील सुन्नी दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. त्यानंतर पाकिस्ताने इराणला हवाई हल्ले करत प्रत्त्यूत्तर दिलं आहे. दरम्यान, मंगळवारी इराणने केलेल्या या हल्ल्यांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले होते. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या दोन तळांना मंगळवारी क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करण्यात आले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)