Pakistan: पंतप्रधान Imran khan यांनी बोलावली कॅबिनेट बैठक; उद्या देशाला करणार संबोधित
9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पाक संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठरावावर मतदान होणार
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा निर्णय देत, याधीचा डेप्युटी स्पीकरचा निर्णय घटनाबाह्य ठरवला आहे. त्यामुळे आता 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पाक संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी उद्या कॅबिनेट बैठक बोलावली आहे. ते उद्या संध्याकाळी देशाला, जनतेला संबोधित करणार आहेत. ते म्हणतात, माझा देशाला संदेश आहे की, मी नेहमीच पाकसाठी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)