Pakistan Blocked Social Media Platform X: पाकिस्तान सरकारने घातली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर बंदी; न्यायालयाचे एक आठवड्यात निर्णय मागे घेण्याचे निर्देश

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'सरकारच्या कायदेशीर सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे' पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्सवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने न्यायालयाला दिली होती.

Social Media Platform X

Pakistan Blocked Social Media Platform X: पाकिस्तानने एलोन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, पाकिस्तान सरकारने फेब्रुवारीमध्येच X वर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र आज पाकिस्तान सरकारने या बंदीला अधिकृत दुजोरा दिला आहे. मात्र पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने (SHC) सरकारला मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्सवरील बंदी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवालानुसार, न्यायालयाने पाकिस्तान सरकारला एका आठवड्यात बंदी उठवण्यास सांगितले. पाकिस्तान सरकारने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, एक्स प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबद्दलच्या चिंता दूर करण्यात ट्विटर/एक्स अयशस्वी झाल्यामुळे ही बंदी आवश्यक बनली आहे.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'सरकारच्या कायदेशीर सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे' पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्सवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने न्यायालयाला दिली होती. (हेही वाचा: Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now