Pakistan: कराचीतील अन्न वितरण केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू

चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Dead-pixabay

पाकिस्तानच्या (Pakistan) बंदर शहर कराचीमध्ये (Karachi) रमजान अन्न वितरण केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरीत लहान मुले आणि महिलांसह किमान 12 लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.अन्न वाटपाच्या वेळी काही लोक नकळत विजेच्या तारेवर पडल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली, त्यानंतर लोक एकमेकांना ढकलून धावू लागले आणि यादरम्यान काही लोक जवळच्या नाल्यात पडले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement