Nepal Bus Accident: नेपाळ येथे बसचा दुर्दैवी अपघात, सात प्रवाशांनी गमावला जीव
नेपाळ येथे बारा जिल्ह्यात भाविकांच्या बसचा दुर्दैवी अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Nepal Bus Accident: नेपाळ येथे एका खासगी बसचा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. भाविकांना घेवून जाणाऱ्या बसचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात जणांनी प्राण गमावले आहेत. बस चालकांचा नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला आहे. नियत्रंण सुटल्याने बस थेट एका मोठ्या खडकावर धडकली. या घटनेत मृत्य झालेल्या सात नागरिकांपैकी सहा नागरिक हे भारतीय असल्याचे वृत्तांनी सांगितले आहे. तसेच एक नागरिक हा नेपाळचा होता. वृत्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागरिक हे राजस्थान जिल्ह्यातील होते. या बसचा रात्रीच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात बारा जिल्ह्यातील दक्षिण भागात झाला. बस मधील इतर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 3 पुरुषांचा आणि 3 भारतीय महिलांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बस मध्ये 34 प्रवासी होते.