Nepal Earthquake: नेपाळच्या प्रचंड भूकंपानंतर भारत सरकारने जारी केला हेल्पलाइन नंबर

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळ पुन्हा एकदा भुकंपाने हादरला आहे. शुक्रवारी मध्यरात्री नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. यामध्ये शेकडो इमारतींची पडझड झाली असून घटनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Nepal Earthquake (PC - ANI)

नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर, 132 लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर, भारताने तातडीच्या मदतीची आवश्यकता असलेल्या भारतीयांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केला आहे. "नेपाळमधील नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मदतीची आवश्यकता असलेल्या भारतीयांसाठी अलर्ट आपत्कालीन संपर्क क्रमांक: +977-9851316807 हा भारत सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now