Nawaz Sharif Returned To Pakistan: नवाझ शरीफ पाकिस्तानात परतले, कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन

नवाझ शरिफ यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 24 ऑक्टोबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ शनिवारी पाकिस्तानात परतले, त्याआधी भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 24 ऑक्टोबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तर, तोशाखाना प्रकरणांमधील अटक वॉरंट भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने स्थगित केले आहे. या दोन आदेशांमुळे शरीफ यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जाते. पाकिस्तानात परतल्यानंतर नवाज शरिफ यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झालेले पहायला मिळाले होते.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement