King Charles Diagnosed With Cancer: ब्रिटनचे किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान; Buckingham Palace ने केली पुष्टी

किंग चार्ल्स यांना नियमित उपचारादरम्यान कर्करोग झाल्याचे निदान झाले. यामुळे डॉक्टरांनी राजा चार्ल्स यांना सार्वजनिक ठिकाणी कोणतेही काम करण्याची परवानगी नाकारली आहे.

King Charles

King Charles Diagnosed With Cancer: ब्रिटनचा राजा चार्ल्स कर्करोगाशी झुंज देत आहे. बकिंघम पॅलेसने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजा चार्ल्स एका प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. मात्र, कर्करोगाचा प्रकार अद्याप समोर आलेला नाही. किंग चार्ल्स यांना नियमित उपचारादरम्यान कर्करोग झाल्याचे निदान झाले. यामुळे डॉक्टरांनी राजा चार्ल्स यांना सार्वजनिक ठिकाणी कोणतेही काम करण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र, या काळात ते अधिकृत काम करत राहणार आहेत. राजा चार्ल्स त्यांच्या उपचाराबाबत पूर्णपणे सकारात्मक आहेत. सध्या त्यांनी त्यांचे जाहीर कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. (हेही वाचा: Chile Wildfires: चिलीच्या जंगलात लागलेली आग दाट लोकवस्तीच्या परिसरात पसरली; 112 लोकांचा मृत्यू, 1600 लोक बेघर, 200 जण बेपत्ता)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement