Italy Bus Accident Videos: इटलीत पर्यटकांना घेऊन जाणारी बस व्हेनिस ब्रिजवरून पडल्याने 21 जणांचा मृत्यू
शहरातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींमध्ये तीन युक्रेनियन, एक क्रोएशियन, एक जर्मन आणि एक फ्रेंच नागरिक आहेत.
इटलीतील व्हेनिसमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी मिथेन वायूवर धावणाऱ्या बसमध्ये इटालियन आणि परदेशी नागरिक होते. दरम्यान, व्हेनिसजवळील मेस्त्रे येथील पूलावर बस नियंत्रणाबाहेर जाऊन खाली पडली. त्यामुळे एका लहान मुलासह 21 जणांना अपघातात जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापौर लुइगी ब्रुगनारो यांनी फेसबुकवर या अपघाताची माहिती दिली. अपघाताबाबत सिटी हॉलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांमध्ये युक्रेनियन पर्यटकांचा समावेश आहे, तर इटालियन वृत्तसंस्था एएनएसएने सांगितले की, मृतांमध्ये जर्मन आणि फ्रेंच नागरिकांचाही समावेश आहे. शहरातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींमध्ये तीन युक्रेनियन, एक क्रोएशियन, एक जर्मन आणि एक फ्रेंच नागरिक आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)