Indonesia Plane Crash: पापुआ येथे सेरुई मधील स्टीव्हनस रुम्बेवास विमानतळावर त्रिगाना एअर फ्लाइटचा अपघात, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप (See Pics and Video)

पापुआच्या सेरुई येथील स्टीव्हनस रुम्बेवास विमानतळावर त्रिगाना एअरचे फ्लाइटचा अपघात झाला. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.

Photo Credit- X

Indonesia Plane Crash: पापुआ (Papua) येथे सेरुई मधील स्टीव्हनस रुम्बेवास विमानतळावर त्रिगाना एअरचे ATR 42-500 विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे मोठा अपघात (Indonesia Plane Crash) झाला. अपघातावेळी विमानात 42 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सोमवारी 9 सप्टेंबर रोजी टेकऑफ दरम्यान ही घटना घडली. अपघातावेळी मोठा आघात झाल्याने काही प्रवासी जखमी झाले. सध्या अधिकारी विमानाचे नुकसान आणि विमानतळाच्या कामकाजाचे मूल्यांकन करत आहे.

 विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे मोठा अपघात 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement