San Francisco: भारतीय दुतावासाच्या बाहेर नागरिकांचे एकता प्रदर्शन, हातात तिरंगा घेऊन 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर एकता दाखवण्यासाठी भारतीय नागरिक जमलेले पहायला मिळाले. देशभक्तीवरील गाण्यावर त्यांनी यावेळी एकत्र नृत्य ही केले.

San Francisco

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) येथील भारताच्या उच्चायुक्त कार्यालयात (Indian consulate) खलिस्तान समर्थकांनी (Khalistan Supporter) तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा भारताने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली होती. यानंतर सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर एकता दाखवण्यासाठी भारतीय नागरिक जमलेले पहायला मिळाले. देशभक्तीवरील गाण्यावर त्यांनी यावेळी एकत्र नृत्य ही केले.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement