Nepal Bus Accident: 40 प्रवाशांना नेपाळला घेऊन जाणारी भारतीय बस नदीत पडली; 14 जणांचा मृत्यू, 16 बचावले
या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत.
Nepal Bus Accident: नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखराहून काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. यात 14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित 10 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही.
तनहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, यूपी एफटी 7623 क्रमांक प्लेट असलेली बस नदीत कोसळली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेपाळमधील बस अपघातस्थळाचा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)