Indian Blogger Arrested By Saudi Police: मोदी समर्थक ब्लॉगर Zahack Tanveer ला सौदी अरेबियात अटक; जाणून घ्या गुन्हा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु या प्रकरणावर ते बारीक लक्ष ठेवून आहे.

Indian Blogger Arrested By Saudi Police

Indian Blogger Zahack Tanveer Arrested By Saudi Police: सौदी साम्राज्याच्या हिताच्या विरोधात काम केल्याच्या आरोपाखाली सौदी सुरक्षा दलांनी भारतीय ब्लॉगर झहॅक तनवीरला (Zahack Tanveer) अटक केली आहे. मोदी समर्थक आणि आरएसएस समर्थक विचारांसाठी ओळखल्या जाणार्‍या झहॅकला 18 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु या प्रकरणावर ते बारीक लक्ष ठेवून आहे. सौदी अधिकाऱ्यांनी झहॅकच्या अटकेमागचे विशिष्ट कारण अद्याप उघड केलेले नाही. देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोपही त्याच्यावर होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Genocide in Nigeria: आफ्रिकन देश नायजेरियामध्ये मोठा नरसंहार; किमान 160 ठार आणि 300 जखमी- Reports)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)