Human Plague Identified in Oregon: एका व्यक्तीला पाळीव प्राण्यामुळे झाला जीवघेणा आजार, जाणून घ्या अधिक माहिती

ओरेगॉनमधील एका व्यक्तीला बुबोनिक प्लेगचे निदान झाले आहे, 2015 पासून या दुर्मिळ बॅक्टेरियाच्या संसर्गाची पहिली पुष्टी समोर आली आहे,

human plague

Human Plague Identified in Oregon: ओरेगॉनमधील एका व्यक्तीला बुबोनिक प्लेगचे निदान झाले आहे, 2015 पासून या दुर्मिळ बॅक्टेरियाच्या संसर्गाची पहिली पुष्टी समोर आली आहे. त्या व्यक्तीला कदाचित त्याचा मांजरीमुळे संसर्ग झाला होता. बुबोनिक प्लेगचा आजार झाल्यानंतर रुग्णाच्या आणि त्याचा मांजरीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना औषधे देण्यात आली आहेत.  डॉ. रिचर्ड फॉसेट, डेस्चुट्स काउंटीचे आरोग्य अधिकारी यांनी गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले की, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार सामान्य अँटीबायोटिक्स जसे की जेंटॅमिसिन आणि फ्लुरोक्विनोलोन हे प्लेगसाठी प्रथम श्रेणीचे उपचार आहेत. [ हे देखील वाचा: First Human Case of Bubonic Plague in Oregon: US Resident Diagnosed With Rare Plague, All You Need To Know About the Disease]

विधानानुसार संक्रमित व्यक्तीवर “सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केले गेले” परंतु या प्रकरणामुळे प्लेग लाखो लोकांना मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला आता किती घातक असेल या बद्दल शंका व्यक्त केली जात आहे. “प्लेग हा आजार प्राण्यांना संक्रमित करू शकतो  आणि आपण जंगलातील सर्व प्राण्यांवर उपचार करू शकत नसल्यामुळे, ते निसर्गात टिकून राहते आणि त्यामुळे अधूनमधून मर्यादित संख्येत प्लेगची प्रकरणे समोर येतात,” डॉ. डॅन बरौच, सेंटर फॉर व्हायरोलॉजी अँड व्हॅक्सिन रिसर्चचे संचालक म्हणाले.

युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी सुमारे सात प्रकरणे नोंदवली जातात. प्लेग हा आजार येर्सिनिया पेस्टिस या जिवाणूमुळे होतो. प्लेग संक्रमितने चावल्यानंतर किंवा संक्रमित प्राण्याशी संपर्क आल्यानंतर हा आजार होऊ शकतो. लक्षणे सुमारे दोन ते आठ दिवसांनी समोर येतात आणि त्यामध्ये वेदना, सुज, ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो.

"जर या स्थितीचे लवकर निदान झाले नाही, तर फुफ्फुसांचा  संसर्ग होऊ शकतो", Deschutes County Health Services च्या अहवाला नुसार 

दरम्यान, रोगाच्या त्या गंभीर प्रकारांवर उपचार करणे अधिक कठीण आहे. आजकाल अँटिबायोटिक्सने “प्लेग सहज ओळखला जातो, सहज निदान होते  आणि सहज उपचार केला जातो”, डॉ. हरीश मूरजानी, नॉर्थवेल हेल्थचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ

"मांजरींना सहज संसर्ग होऊ शकतो," "कुत्र्यांना देखील संसर्ग होऊ शकतो, परंतु मांजरींना आणखी सहजपणे संसर्ग होऊ शकतो. चिपमंक्स, उंदीर हे सामान्यतः जंगलात संक्रमित होणारे  प्राणी आहेत. "चांगली स्वच्छता आणि नीट काळजी घेतल्यास हा आजार  प्लेग टाळता येऊ शकते," मूरजानी म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement