Hijab Ban in Muslim-Majority Country: तब्बल 96 टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही 'या' देशाने घातली हिजाबवर बंदी; सभागृहात विधेयकाला मंजुरी

हा कायदा प्रामुख्याने हिजाब किंवा इस्लामिक हेड स्कार्फ आणि इस्लामिक कपड्याच्या इतर पारंपारिक बाबींना लक्ष्य करतो, जे अलीकडच्या काही वर्षांत मध्य पूर्वेतून ताजिकिस्तानमध्ये ट्रेंड करू लागले आहेत.

Hijab (File Image)

Tajikistan Hijab Ban: हिजाबबाबत अनेक देशांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. भारतामध्येही हा मुदा वादग्रस्त ठरला आहे. आता मध्य आशियाई देश ताजिकिस्तानने हिजाबवर औपचारिक बंदी घातली आहे. या संदर्भात, देशाच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने 19 जून रोजी एका विधेयकाचे समर्थन केले आहे. अहवालानुसार, हे विधेयक संसदेचे वरिष्ठ सभागृह मजलिसी मिलीच्या 18 व्या अधिवेशनादरम्यान मंजूर करण्यात आले. त्याधी 8 जून रोजी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने हिजाब बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली होती. हा कायदा प्रामुख्याने हिजाब किंवा इस्लामिक हेड स्कार्फ आणि इस्लामिक कपड्याच्या इतर पारंपारिक बाबींना लक्ष्य करतो, जे अलीकडच्या काही वर्षांत मध्य पूर्वेतून ताजिकिस्तानमध्ये ट्रेंड करू लागले आहेत. देशाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा संबंध इस्लामी अतिरेक्यांशी जोडला आहे. अखेर अनेक वर्षांच्या अनौपचारिक बंदीनंतर ताजिकिस्तानने इस्लामिक हिजाबला बेकायदेशीर घोषित केले आहे. ताजिकिस्तानने दाढी वाढवण्यासही अनधिकृतपणे बंदी घातली आहे. अहवालानुसार, ताजिकिस्तानची लोकसंख्या 96% मुस्लिम आहे. (हेही वाचा: Hijab Ban in Chembur College: चेंबूर कॉलेजमधील हिजाब, नकाब आणि बुरखा बंदीचे प्रकरण पोहोचले न्यायालयात; विद्यार्थिनींनी दाखल केली याचिका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)