Hindu Temple Vandalised: कॅनडात भारतविरोधी भित्तिचित्रांसह हेरिटेज हिंदू मंदिराची विटंबना, भारतीय वाणिज्य दूतावासाकडून निषेध व्यक्त

गौरी शंकर मंदिरातील तोडफोडीच्या कृत्याचा निषेध करताना टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, मंदिराची विटंबना केल्याने कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील एका प्रख्यात हिंदू मंदिराला भारतविरोधी भित्तिचित्रांनी लक्ष्य करण्यात आले असून त्यामुळे भारतीय समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ब्रॅम्प्टन प्रांतात एका हिंदू मंदिराची 'भारतविरोधी' ग्राफिटीने तोडफोड केल्याने भारतीय समुदायाला धक्का बसला. टोरोंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने मंगळवारी एक निवेदन जारी करून ब्रॅम्प्टनमधील गौरी शंकर मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. गौरी शंकर मंदिरातील तोडफोडीच्या कृत्याचा निषेध करताना टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, मंदिराची विटंबना केल्याने कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हेही वाचा Peshawar Suicide Blast: पाकिस्तानातील पेशावर येथे आत्मघातकी हल्ला; मृतांची संख्या 83 वर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)