Heavy Rain in Spain Video: स्पेनच्या काही भागात मुसळधार पाऊस, रेल्वे सेवा बंद, लोकांना घरीच राहण्याचे दिले आदेश

स्पेन मध्ये पावसाने कहर केल्याची माहिती मिळाली आहे.मुसळधार पावसाने थैमान घातल्याने काही रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आले आहे.

Heavy Rain in Spain Video: स्पेनच्या काही भागात मुसळधार पाऊस, रेल्वे सेवा बंद, लोकांना घरीच राहण्याचे दिले आदेश
Spain Heavy rain pc Twitter

Heavy Rain in Spain Video: स्पेन मध्ये मुसळधार पाऊस असल्याची माहिती मिळाली आहे. मुसळधार पावसाचा कहर माजल्यानंतर स्पेन मध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आले आहे. तसेच एक फुटबॉल सामान देखील वातावरण बिघडल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे. काही भागात तीव्र पावसाने जनजीवन विसकळीत केल्याची माहिती मिळाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना  घरीच राहण्याचे आदेश दिले आहे. रविवारी, माद्रिद आणि आसपासच्या भागात तीव्र पावसासाठी हवामानाचा इशारा देण्यात आला होता. स्पेनच्या राष्ट्रीय हवामान एजन्सी AEMET ने रेड अलर्ट जारी केला, ज्याचा अर्थ माद्रिद प्रदेश, टोलेडो प्रांत आणि कॅडीझ शहरात अतिवृष्टीचा धोका होता. माद्रिद आणि व्हॅलेन्सियाच्या पूर्व किनारपट्टी प्रदेश आणि इतर मार्गांदरम्यानची रेल्वे सेवा काही काळ बंद करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2023 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).