Goldy Brar Murder: कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार जिवंत आहे; अमेरिकन पोलिसांनी नाकारले मृत्यूचे वृत्त- Reports

अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचे बातमी नाकारली आहे. कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो येथे झालेल्या हत्येतील मृत व्यक्तीचे नाव 37 वर्षीय झेवियर ग्लॅडनी असल्याचे त्यांनी सांगितले.

Goldy Brar and Sidhu Moose Wala (Image source: Twitter)

Goldy Brar Murder: सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार जिवंत आहे. याआधी बुधवारी या प्रसिद्ध गुंडाच्या हत्येची बातमी आल्याने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. मात्र, वृत्ताला अधिकृत दुजोरा न मिळाल्याने हा केवळ दावाच ठरला. आता अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचे बातमी नाकारली आहे. कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो येथे झालेल्या हत्येतील मृत व्यक्तीचे नाव 37 वर्षीय झेवियर ग्लॅडनी असल्याचे त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे याबाबतही पंजाबस्थित पत्रकार गगनदीप सिंग यांनी सोशल मिडियावर माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मिडियावर दावा केला की, कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो पोलीस विभागाने बुधवारी एका गोळीबाराच्या घटनेत हल्ला केलेल्या दोन व्यक्तींपैकी एक कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार असल्याचे वृत्त नाकारले. (हेही वाचा: Goldy Brar Death: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गँगस्टर गोल्डी ब्रारची हत्या; कॅलिफोर्नियामध्ये प्रतिस्पर्धी टोळीने घातल्या गोळ्या- Reports)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now