Matthew Perry Dead: फ्रेंडर्स मालिकेतील 'या' प्रसिध्द अभिनेत्याचा मृत्यू, लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

इंग्रिजी भाषेतील सुप्रसिध्द फ्रेंडर्स मालिकेतील प्रसिध्द अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृत्यू झाला आहे. कलाकारा विश्वात मोठी शोककला पसरली आहे.

Matthew Perry Found Dead

Matthew Perry Dead: इंग्रिजी भाषेतील सुप्रसिध्द फ्रेंडर्स मालिकेतील प्रसिध्द अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृत्यू झाला आहे. कलाकारा विश्वात मोठी शोककला पसरली आहे. मॅथ्यूने मजेदार चँडलर बिंगच्या भूमिकेने जगभरात प्रसिद्धी मिळवली. या बातमीने केवळ हॉलिवूडमध्येच नव्हे तर जगभरात धक्का बसला आहे आणि कोट्यवधी फ्रेंड्सचे चाहते शोक करत आहेत. मॅथ्यू पेरी रविवारी पहाटे त्याच्या लॉस एंजेलिसच्या घरी हॉट टबमध्ये मृतावस्थेत आढळून आले. अहवालानुसार, घरात असतानाच त्याचा मृत्यू झाला, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पेरीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे दिसते. पोलिसांना घटनास्थळावर कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत. अभिनेत्याने अखेरचा श्वास घेण्यापूर्वी नेमके काय घडले हे अद्यप अस्पष्ट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement