Nawaz Sharif Driver Spit On Woman: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ड्रायव्हरचे घृणास्पद कृत्य, प्रश्न विचारणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर थुंकला; Watch Video
नवाझ शरीफ यांचा ड्रायव्हर महिलेवर थुंकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नवाझ शरीफ यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ही घटना लंडनच्या हाइड पार्क भागात घडली आहे.
Nawaz Sharif Driver Spit On Woman: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एनचे नेते नवाझ शरीफ त्यांच्या देशात परतणार असल्याच्या अटकलेदरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये नवाझ शरीफ यांचा ड्रायव्हर लंडनमध्ये एका महिलेवर थुंकताना दिसत आहे. घटनेच्या वेळी नवाझ शरीफ कारमध्ये बसले होते. नवाझ शरीफ यांचा ड्रायव्हर महिलेवर थुंकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नवाझ शरीफ यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ही घटना लंडनच्या हाइड पार्क भागात घडली आहे. येथे एक महिला नवाज शरीफ यांच्या कारपर्यंत पोहोचली. तिने कारची खिडकी ठोठावली आणि नवाझ शरीफ यांना नमस्कार केला. यावेळी ही महिला म्हणते की, मी ऐकले की तुम्ही पाकिस्तानचे अत्यंत भ्रष्ट राजकारणी आहात. तिचा प्रश्न ऐकून नवाज शरीफ यांचा ड्रायव्हर संतापला आणि तो प्रश्न विचारणाऱ्या महिलेवर थुंकला. महिलेवर थुंकल्यानंतर चालक खिडकी बंद करून नेत्यासह घटनास्थळावरून निघून गेला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)