Flight Loses Tyre: प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं हवेतच चाक निखळलं अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा थरारक व्हिडिओ पाहा
सॅन फ्रान्सिस्कोहून उड्डाण घेऊन जपानला जाणाऱ्या विमानाच अचानक चाक निखळलं आणि टायर थेट पार्क असलेल्या कारवर पडला. ज्या कारवर हे चाक पडलं त्या कारची मागची बाजू चक्काचूर झाली आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. सध्या हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Flight Loses Tyre: विमानाने उड्डाण घेताच अवघ्या काही सेकंदात विमानाचं टायर निखळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 777-200 विमान सॅन फ्रान्सिस्कोहून उड्डाण घेऊन जपानला जात होते. त्यावेळी विमानात 235 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर होते. अचानक विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गियर असेंब्लीवरील सहा टायरपैकी एक टायर निखळला आणि तो खाली पडला. विशेष म्हणजे हा टायर खाली एका पार्क असलेल्या कारवर पडला. ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. टायर खूप उंतावरून खाली पडल्यामुळे कारची मागची बाजू चक्काचूर झाली. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
महाराष्ट्रात पुन्हा धावणार पारंपारिक 3 x 2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस; MSRTC ने दिली नवीन गाड्या खरेदीस मान्यता, 204 स्थानकांवर सुरु होणार ATM ची सुविधा
Delhi-Shirdi Air Hostess Molestations Case: दिल्ली-शिर्डी इंडिगो 6E 6404 विमानात प्रवाशाचे एअर होस्टेस सोबत गैरवर्तन; आरोपी अटकेत
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी
Advertisement
Advertisement
Advertisement