Firing at Imran Khan’s Container: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; इम्रान यांच्यासह 4 जण जखमी

डॉन न्यूज टीव्हीने गुरुवारी वृत्त दिले की, वजिराबादमधील अल्लाह हो चौकाजवळ पीटीआय अध्यक्ष इम्रान खान यांच्या कंटेनरवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात इम्रान खान थोडक्यात बचावले असले तरी त्यांना दुखापत झाली आहे.

Firing at Imran Khan’s Container: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; इम्रान यांच्यासह 4 जण जखमी
Pakistan PM Imran Khan (Photo Credit - FB)

Firing at Imran Khan’s Container: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, या गोळीबारात इम्रानसह किमान 4 जण जखमी झाले आहेत. डॉन न्यूज टीव्हीने गुरुवारी वृत्त दिले की, वजिराबादमधील अल्लाह हो चौकाजवळ पीटीआय अध्यक्ष इम्रान खान यांच्या कंटेनरवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात इम्रान खान थोडक्यात बचावले असले तरी त्यांना दुखापत झाली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खानही जखमी झाले आहेत. त्याच्या उजव्या पायावर पट्टी दिसते. तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) निषेध मोर्चाचा गुरुवारी सातवा दिवस आहे.

इम्रान खान लाहोर ते इस्लामाबाद पदयात्रा काढत आहेत. या मोर्चादरम्यान ते ज्या कंटेनरमध्ये होते त्या कंटेनरजवळ गोळीबार झाला आहे. या हल्ल्यानंतर इम्रान खान यांना कंटेनरमधून काढून गाडीत बसवण्यात आले. हल्लेखोरांना पकडण्यात आले असले तरी अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2022 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).