Fake GPS: बनावट जीपीएस वापरून विमानांची केली दिशाभूल; तब्बल 20 फ्लाईट्स त्यांच्या मूळ मार्गावरून भरकटल्या

तपासादरम्यान, विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टीममध्ये घुसखोरी करण्यासाठी जमिनीवरून बनावट सिग्नल पाठवण्यात आल्याचे उघड झाले आणि हे खोटे सिग्नल इतके अचूक होते की त्यामुळे अनेक विमानांचा रस्ता चुकला.

Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

इराणच्या हवाई क्षेत्रात बनावट जीपीएस सिग्नल पाठवून विमाने वळवण्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 15 दिवसांत सुमारे 20 विमाने बनावट जीपीएस सिग्नलद्वारे त्यांच्या मूळ मार्गावरून वळवण्यात आल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणवरून उडणाऱ्या किमान 20 विमाने आणि कॉर्पोरेट जेटना बनावट जीपीएस सिग्नलद्वारे लक्ष्य करण्यात आले. तपासादरम्यान, विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टीममध्ये घुसखोरी करण्यासाठी जमिनीवरून बनावट सिग्नल पाठवण्यात आल्याचे उघड झाले आणि हे खोटे सिग्नल इतके अचूक होते की त्यामुळे अनेक विमानांचा रस्ता चुकला. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, उड्डाण भरकटल्यानंतर आणि नेव्हिगेशन सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानंतर पायलटना विमान उतरवण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ची मदत घ्यावी लागली. (हेही वाचा: Spain Night Club Fire Video: स्पेनमधील नाईट क्लबला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now