Israel Hamas Crisis: इस्रायल-हमास युद्धादरम्यान इलॉन मस्कची मोठी घोषणा, स्टारलिंकवरून गाझाला इंटरनेट सेवा प्रदान करणार

स्टारलिंक ही मस्कची इंटरनेट सेवा देणारी कंपनी आहे, ज्याच्या विकासात त्यांची स्वतःची स्पेस फ्लाइट कंपनी SpaceX चा मोठा वाटा आहे.

Elon Musk

गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असून, त्यामुळे काल रात्री गाझा पट्टीतील दळणवळण आणि इंटरनेट सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एलॉन मस्क यांनी गाझा पट्टीमध्ये मानवतावादी मदतीसाठी त्यांची स्टारलिंक इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

स्टारलिंक ही मस्कची इंटरनेट सेवा देणारी कंपनी आहे, ज्याच्या विकासात त्यांची स्वतःची स्पेस फ्लाइट कंपनी SpaceX चा मोठा वाटा आहे. स्टारलिंक उपग्रहांचे आयुष्य जरी 5 वर्षे असले तरी सध्या स्पेसएक्सचे 42 हजार उपग्रह अंतराळात आहेत, ज्याद्वारे ते कुठेही इंटरनेट सुविधा देऊ शकतात.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement