Dallas: राईड रद्द केल्यानंतर वृध्द व्यक्तीला मारहाण, चालक घटनास्थळावरून फरार (Watch Video)

राईड रद्द केल्यानंतर उबेर ड्रायव्हरने एका वृध्द व्यक्तीला मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना डॅल्लास येथे घडली आहे. सुलेमान गौबा असं मारहाण करणाऱ्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे.

Uber | (File Image)

Dallas: राईड रद्द केल्यानंतर उबेर ड्रायव्हरने एका वृध्द व्यक्तीला मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना डॅल्लास येथे घडली आहे. सुलेमान गौबा असं मारहाण करणाऱ्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे. गौबा हे कारमधून बाहेर पडल्यानंतर चालकाने त्यांच्या डोक्यात मागच्या बाजूला मारले. या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावरून आरोपी चालक पळून गेला. पोलिसांनी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गौबा यांनी सांगितले की, आरोपीने उबेरमध्ये बसल्यानंतर ही मारहाण केली होती. कार पुढे चालवण्यास सांगितले परंतु त्याने गैरवर्तन केले. (हेही वाचा- वर्सोवा मध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरूणाकडून रिक्षातील प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन, मोबाईल ही हिसकावला; पोलिसांनी 12 तासांत लावला आरोपींचा छडा)

मारहाणीचा व्हिडओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now