Donald Trump-Elon Musk Interview: डोनाल्ड ट्रम्प 12 ऑगस्ट रोजी एलॉन मस्कसोबत देणार एक मोठी मुलाखत; सोशल मीडियावर केली घोषणा

ट्रम्प यांचे हे पाऊल त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, कारण एलोन मस्क यांची लोकप्रियता केवळ अमेरिकेतच मर्यादित नाही तर ते जगभरातील प्रसिद्ध लोकांमधील एक आहेत.

Donald Trump-Elon Musk

Donald Trump-Elon Musk Interview: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे वातावरण दिवसेंदिवस रंजक बनत चालले आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात स्पेसएक्सचे संस्थापक आणि टेस्ला कार कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांच्यासोबत एक मुलाखत देणार असल्याची घोषणा केली आहे. ‘सोमवारी, 12 ऑगस्ट रात्री मी एलोन मस्कसोबत एक मोठी मुलाखत देणार’, असे माजी अध्यक्षांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले. ट्रम्प यांचे हे पाऊल त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, कारण एलोन मस्क यांची लोकप्रियता केवळ अमेरिकेतच मर्यादित नाही तर ते जगभरातील प्रसिद्ध लोकांमधील एक आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी निवडणुकीतून आपले नाव मागे घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बनवण्यात आले होते. त्यानंतर भारतीय वंशाच्या हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅरिस यांचा दावा खूपच मजबूत मानला जात आहे. (हेही वाचा: US Presidential Election 2024: Kamala Harris यांनी VP Running Mate साठी केली Minnesota चे गव्हर्नर Tim Walz यांची निवड)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now