Dawood Ibrahim Dead? दाऊद इब्राहिम चा विषप्रयोगानंतर मृत्यू? मीडीया रिपोर्ट्स नंतर चर्चांना उधाण

सध्या दाऊदच्या कुटुंबालादेखील सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Dawood Ibrahim (Photo Credits: ANI)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तान मध्ये विषप्रयोगानंतर मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. जावेद मियादाद या पाकिस्तानी क्रिकेटर आणि दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक असलेल्याच्या कुटुंबाला सध्या हाऊस अरेस्ट करण्यात आल्याच्या वृत्तामुळे दाऊदच्या मृत्यूची चर्चा होत आहे. सोशल मीडीयात केल्या जात असलेल्या दाव्यानुसार एका अज्ञात व्यक्तीने कराची मध्ये दाऊदला विष दिले. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या दाऊदच्या कुटुंबालादेखील सुरक्षा पुरवण्यात आली आहे. नवी दिल्लीतील पोलिस आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या परिस्थितीवर मौन बाळगले आहे आणि असा दावा केला आहे की असे अनेक अहवाल आहेत, जे नियमितपणे समोर येत आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक खोट्या अफवा आहेत. Dawood Ibrahim hospitalised in Karachi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)