China Accident : उत्तर चीनच्या शांक्सीमध्ये बस अपघातात १४ जणांचा मृत्यू, ३७ जखमी
चीनच्या शांक्सी प्रांतात मंगळवारी भीषण आपघात झाला. प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
China Accident : चीनच्या शांक्सी प्रांतात हुबेई एक्स्प्रेसवेवर मंगळवारी मोठा आपघात (Accident )झाला. प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळून (Bus Crash Into Tunnel Wall) १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी २:३० च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ३७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बस भिंतीवर कशी आदळली. यात बसमध्ये बिघाड झाला होता? की चालक दोषी होता? याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा : Accident on Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पहिला अपघात, संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)