Justin Trudeau Resigns As PM: जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार
कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले की, वाढत्या Leadership Crisis मुळे पाठिंबा गमावल्यानंतर ते लिबरल पक्षाचे नेते म्हणूनही राजीनामा देणार आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau यांनी पीएम पदासोबतच लिबरल पार्टी च्या नेते पदाचा देखील राजीनामा देत असल्याची आज (6 जानेवारी) घोषणा केली आहे. 2015 पासून पंतप्रधान पदी असलेल्या Justin Trudeau या निर्णयाची घोषणा करताना भावूक झालेले दिसले. Liberal Party च्या अध्यक्षांना आपण कालच याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे. पुढील नेता निवडीपर्यंत ते पदावर कायम राहणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आपण लढवय्ये आहोत असं म्हटलं आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांचा राजीनामा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)