British Airways Data Theft: ब्रिटिश एअरवेजवर सायबर हल्ला; कर्मचार्‍यांची नावे, आडनाव, जन्मतारीख, बँकिंग तपशीलांसह वैयक्तिक माहिती उघड

सायबर हल्ल्यात कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीशी तडजोड केली गेली आहे. पेरोल प्रदाता झेलिसच्या हॅकमुळे कर्मचार्‍यांची नावे, आडनाव, जन्मतारीख तसेच संभाव्य बँकिंग तपशीलांसह त्यांची वैयक्तिक माहिती उघड झाली,

Representational Image (Photo Credit: PTI)

ब्रिटिश एअरवेजमधून सायबर हल्ल्याचे मोठे प्रकरण समोर येत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती चोरीला गेली आहे. ब्रिटीश एअरवेजने आपल्या सुमारे 35,000 कर्मचार्‍यांना याबाबत माहिती दिली आहे. झेलिस (Zellis) या वेतन पुरवठादारावर हा हल्ला झाला आहे. ब्रिटिश एअरवेज कंपनी झेलिसचे ग्राहक आहे. एअरलाइनसाठी हा सायबर हल्ला मोठा धक्का मानला जात आहे. सायबर हल्ल्यात कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीशी तडजोड केली गेली आहे. पेरोल प्रदाता झेलिसच्या हॅकमुळे कर्मचार्‍यांची नावे, आडनाव, जन्मतारीख तसेच संभाव्य बँकिंग तपशीलांसह त्यांची वैयक्तिक माहिती उघड झाली, असे ब्रिटिश एअरवेजवर प्रवक्त्याने सांगितले. MOVEit या फाईल ट्रान्स्फर सॉफ्टवेअरमध्ये घुसून चोरांनी हा हल्ला केला आहे. हजारो कंपन्यांना याचा फटका बसल्याचे समजते. झेलिसने सोमवारी पुष्टी केली की, त्यांच्या आठ क्लायंटना याचा फटका बसला आहे. (हेही वाचा: Artificial Intelligence Kill Jobs: 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस'मुळे यूएसमधील 4000 कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now