Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानमध्ये पोलीस स्टेशनवर आत्मघातकी हल्ला; आठ पोलिसांसह किमान 10 लोक ठार, 20 हून अधिक जखमी
पोलीस ठाण्याच्या आत किमान दोन स्फोट झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्याची एक मोठी घटना घडली आहे. स्वात जिल्ह्यातील कबाल शहरातील काउंटर टेररिझम डिपार्टमेंट (CTD) पोलीस स्टेशनवर झालेल्या संशयित आत्मघातकी हल्ल्यात आठ पोलिसांसह किमान 10 लोक ठार झाले असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तानच्या जिओ न्यूजने ही माहिती दिली आहे. खैबर पख्तूनख्वामधील मलाकंद विभागातील स्वात जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. पोलीस ठाण्याच्या आत किमान दोन स्फोट झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. संपूर्ण परिसरातील पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या घटना वाढल्या आहेत. येथे दहशतवादी कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. (हेही वाचा: Texas High School Shooting: टॅक्सास हायस्कूलच्या प्रॉम पार्टीत गोळीबार, 9 मुले जखमी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)