Blast In Pakistan's Peshawar: पाकिस्तानातील पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती स्फोट; मौलानासह अनेकांचा मृत्यू

स्फोटात किमान चार जण ठार झाले. तसेच 12 जण जखमी झाले. वृत्तानुसार, शुक्रवारच्या नमाज दरम्यान हा स्फोट झाला.

Blast In Pakistan's Peshawar (फोटो सौजन्य - X/@umashankarsingh)

Blast In Pakistan's Peshawar: पाकिस्तान (Pakistan) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती स्फोट (Blast) घडवून आणण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वाचे पोलिस महानिरीक्षक झुल्फिकार हमीद यांनी पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की, अकोरा खट्टक येथील दारुल उलूम हक्कानिया मशिदीत झालेल्या स्फोटात किमान चार जण ठार झाले. तसेच 12 जण जखमी झाले. वृत्तानुसार, शुक्रवारच्या नमाज दरम्यान हा स्फोट झाला. नमाज पठणाच्या वेळी मशिदीत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यादरम्यान, हा आत्मघाती स्फोट झाला.

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये स्फोट - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now