Twitter Deal करण्यापूर्वी; एलन मस्क अचानक ट्विटर मुख्यालयात पोहोचले, प्रोफाइलच्या बायोमध्ये केले बदल
तसेच त्यांनी डिसक्रिप्टर 'चीफ ट्वीट' असं लिहिलं. त्यानंतर एलन मस्क ट्विटरवर ऑफिसमध्ये पोहोचल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एलन मस्क (Elon Mask) बुधवारी ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले. न्यायालयानं शुक्रवारपर्यंत 44 बिलियन डॉलर्सची ही डील पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. या मुदतीच्या दोन दिवस आधीच एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर बायोमध्येही काही बदल केले आहेत. मस्क यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये लोकेशन 'ट्विटर हेडक्वॉर्टर' असे बदल केलं आहे. तसेच त्यांनी डिसक्रिप्टर 'चीफ ट्वीट' असं लिहिलं. त्यानंतर एलन मस्क ट्विटरवर ऑफिसमध्ये पोहोचल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, एलन मस्कने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये तो ट्विटर हेड क्वार्टरमध्ये एक बेसीन सिंक घेऊन जाताना दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Entering Twitter HQ – let that sink in!'.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)