Abbas Ali Soleimani Assassination Video: इराणचे शक्तिशाली धार्मिक नेते अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी यांची हत्या, संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद
त्यांच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी (Ayatollah Abbas Ali Soleimani) यांचा बुधवारी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी हे इराणमधील सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक होते. त्यांच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका बंदुकधारीने अब्बास अली सुलेमानी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे दिसत आहे. हल्लेखोराने अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी यांच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी 75 वर्षांचे होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)