Cambodia's New Year 2024: भारताच्या राजदूत देवयानी खोब्रोगडे यांनी 'अप्सरा'चा पोशाष परिधान करून कंबोडियन नागरिकांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!
राजदूत देवयानी खोब्रागडे यांना ख्मेर संस्कृती आणि परंपरेबद्दल खूप कौतुक आहे. ख्मेर नववर्षाच्या भावनेला अंगीकारून, त्यांनी ख्मेर अप्सरा म्हणून सुरेख वेषभूषा केली.
Cambodia's New Year 2024: कंबोडियातील भारतीय दूतावासाने अलीकडेच भारताच्या राजदूत देवयानी खोब्रोगडे (Devyani Khobrogade) यांच्या पारंपारिक कंबोडियन पोशाखातील फोटोशूटमधील प्रतिमा शेअर केल्या आहेत. ज्यात त्यांनी 'अप्सरा' म्हणून पोशाख केला आहे. ख्मेर नववर्षानिमित्त कंबोडियन लोकांना शुभेच्छा देण्यासाठी देवयानी खोब्रोगडे यांनीन 'ख्मेर अप्सरा' म्हणून वेषभूषा केली. राजदूत देवयानी खोब्रागडे यांना ख्मेर संस्कृती आणि परंपरेबद्दल खूप कौतुक आहे. ख्मेर नववर्षाच्या भावनेला अंगीकारून, त्यांनी ख्मेर अप्सरा म्हणून सुरेख वेषभूषा केली. दूतावासाने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिलं आहे की, 'आमच्या सभ्यतेच्या समृद्ध बंधनाला मूर्त रूप धारण केले. आमच्या सर्व कंबोडिया मित्रांना ख्मेर नववर्षाच्या आनंददायी उत्सवाच्या शुभेच्छा.'
फोटोंमध्ये देवयानी खोब्रागडे पारंपारिक कंबोडियन पोशाखात दिसत आहे. त्यांनी पारंपारिक सोन्याचे दागिने आणि हेडगियर सोबत पारंपारिक ख्मेर सॅम्पोट, एक प्रकारचा लपेटलेला स्कर्ट घातलेला आहे.