Thailand Bus Fire: टायर फुटल्याने सहलीला निघालेल्या बसला आग; 44 पैकी 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंड नेशन, उथाई थानी येथील शाळेतील 44 विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन ही बस प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीसाठी अयुथयाकडे जात असताना तिचा पुढचा एक टायर फुटला. यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटले आणि बस धातूच्या खांबाला धडकली. यामुळे बसला आग लागली.

Thailand bus fire (फोटो सौजन्य -X/@BaapofOption)

Thailand Bus Fire: थायलंडमध्ये 44 मुलांना घेऊन जाणाऱ्या बसला आग (Thailand Bus Fire) लागल्याने 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. थायलंडमधील खु खोत येथील झीर रंगसिट शॉपिंग मॉलजवळ फाहोन योथिन रोडवर स्कूल बसला आग लागली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंड नेशन, उथाई थानी येथील शाळेतील 44 विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन ही बस प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीसाठी अयुथयाकडे जात असताना तिचा पुढचा एक टायर फुटला. यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटले आणि बस धातूच्या खांबाला धडकली. यामुळे बसला आग लागली. स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

सहलीला निघालेल्या बसचा टायर फुटल्याने लागली भीषण आग; 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now