Somalia Terrorist Attack: सोमालियातील लिड्डो बीचवर आत्मघाती बॉम्बहल्ला आणि गोळीबार; 32 ठार, 63 जखमी (Watch Video)
आत्मघातकी बॉम्बहल्ला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात 32 जणांचा मृत्यू झाला. तर, 63 जण जखमी झाले आहेत.
Somalia Terrorist Attack: सोमालियातील मोगादिशू येथील लिड्डो बीचवर विनाशकारी दहशतवादी हल्ला (Somalia Terrorist Attack)झाला. आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेल्या बंदुकींच्या हल्ल्यात (Gun Attack) 32 जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय, 63 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी, 2 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. अल-शबाब या अतिरेकी गटाच्या एका बॉम्बरने समुद्रकिनाऱ्यावर स्फोट केला. त्यानंतर बंदूकीने तेथे गोळीबार झाला. X वर शेअर केलेले व्हिडिओ समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेले मृतदेह आणि लोक सुरक्षिततेसाठी पळून जात असलेले भयानक दृश्य दाखवत आहेत.(हेही वाचा:Uttar Pradesh: अलिगडयेथे शाळेत शिक्षिकेचा कारनामा! चटई अंथरूण झोपली, चिमुकल्यांकडून हातातील पंख्याने हावा (Watch Video))
व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)