Mexico Bus Accident: मेक्सिको येथे बस दरीत कोसळली,या अपघातात 27 जण दगावले, 17 जण गंभीर अवस्थेत
मेक्सिको येथे बसचा अपघात झाल्याने २७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. १७ जणांना गंभीर जखमा झाले आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mexico Bus Accident: मेक्सिको येथील दक्षिणेकडील ओक्साका (Oaxaca) राज्यात बुधवारी एक खासगी बस डोंगराच्या रस्त्यावरून दरीत कोसळी. या दुर्घटनेत 27 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी बचावकार्तेंनी धाव घेतला. तेथून 17 लोकांना वाचवण्यात आले आहे. त्यांना गंभीर जखमा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओक्साका राज्य सरकारी वकील बर्नार्डो रॉड्रिग्ज अलामिल्ला यांनी टेलिफोनद्वारे एएफपीला (AFP) या घटनेबाबत माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)