Passenger Train Derails in Pakistan: पाकिस्तानमध्ये पॅसेंजर ट्रेनचे 10 डबे रुळावरून घसरले; 22 जण ठार, अनेक जखमी

अपघातानंतर जवळच्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला आहे.

Passenger Train Derails in Pakistan (PC - Twitter/ @htTweets)

Passenger Train Derails in Pakistan: रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसच्या 10 बोगी रेल्वे रुळावरून घसरल्याने पाकिस्तानमध्ये किमान 22 जण ठार आणि 50 जखमी झाले. शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान असलेल्या सहारा रेल्वे स्टेशनजवळ रविवारी हा अपघात झाला, असे जिओ टीव्हीने वृत्त दिले आहे. ही ट्रेन कराचीहून पाकिस्तानच्या पंजाबकडे जात असताना हा अपघात झाला. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार बाधित लोकांना नवाबशाह येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघातानंतर जवळच्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)