Man Takes Bath in Subway: काय सांगता? व्यक्तीने चक्क कपडे काढून न्यू यॉर्क सिटी मेट्रोमध्ये केली अंघोळ (Watch Video)

डब्यातील इतर लोक या व्यक्तीच्या कृतीवर हसत आहेत. मात्र त्यांच्या हसण्याची पर्वा न करता तो अंघोळ करणे चालू ठेवतो.

Man Takes Bath in Subway

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मेट्रो ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती न्यूयॉर्क सिटी ट्रेनच्या डब्यात चक्क आंघोळ करत आहे. अंघोळ करण्यापूर्वी ही व्यक्ती आपल्या शरीरावरील कपडे काढतो. त्यानंतर मोठ्या पिवळ्या स्पंजने शरीर घासू लागतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डब्यातील इतर लोक या व्यक्तीच्या कृतीवर हसत आहेत. मात्र त्यांच्या हसण्याची पर्वा न करता तो अंघोळ करणे चालू ठेवतो. अशा प्रकारे विचित्र पद्धतीने आंघोळ केल्यानंतर ही व्यक्ते पुन्हा आपले कपडे घालतो. काही लोकांनी या व्यक्तीच्या कृत्याला धाडसी तर अनेकांनी मूर्खपणा म्हटले आहे.

व्यक्तीने सबवेमध्ये केली अंघोळ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now