Viral Video: नागदा जंक्शन स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढताना रुळांमध्ये अडकलेला प्रवासी, आरपीएफ जवानाने वाचवले प्राण (Watch Video)
रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये अडकलेल्या एका प्रवाशाला सोमवारी आरपीएफ जवानाने त्याला वाचवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाला आहे.
रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी यांच्याकडून सातत्याने सल्ला देऊनही काही प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करून जीव धोक्यात घालतात. अशाच एका घटनेत नागदा जंक्शन रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये अडकलेल्या एका प्रवाशाला सोमवारी आरपीएफ जवानाने त्याला वाचवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाला आहे. ट्रेनमधून बाहेर पडताना एका प्रवाशाने वेगवान ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये तो अडकला. चालत्या ट्रेनसोबत प्रवाशाला ओढले जात असल्याचे पाहून ट्रेनला समांतर वेगाने धावणाऱ्या कॉन्स्टेबलने प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)