ZoomInfo Layoffs: यूएस- स्थित तंत्रज्ञान कंपनी झूमइन्फो करणार कर्मचारी कपात; 3 टक्के लोकांना कामावरून काढून टाकणार

कंपनीने सांगितले की ते सर्व प्रभावित कर्मचार्‍यांना सरासरी 10 आठवड्यांचे वेतन, इक्विटी अवॉर्ड वेस्टिंग आणि आरोग्य सेवा व शिक्षण निधी प्रदान करेल.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरातील अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता यामध्ये यूएस स्थित तंत्रज्ञान कंपनी झूमइन्फो सामील झाली आहे. झूमइन्फोने शुक्रवारी सांगितले की, ते आपल्या कर्मचार्‍यां संख्येमध्ये सुमारे 3% कपात करणार आहेत. कंपनीने 2 जून 2023 रोजी, त्यांच्या कर्मचार्‍यांना याबाबत सूचित केले. कंपनीने सांगितले की ते सर्व प्रभावित कर्मचार्‍यांना सरासरी 10 आठवड्यांचे वेतन, इक्विटी अवॉर्ड वेस्टिंग आणि आरोग्य सेवा व शिक्षण निधी प्रदान करेल. कंपनीकडे 31 डिसेंबर 2022 पर्यंत 3,540 कर्मचारी होते. मात्र कंपनीने हेही स्पष्ट केले की, कोणतीही नियुक्ती फ्रीझ होणार नाही. काही विभाग आणि संघांमध्ये कंपनी भरती सुरू ठेवेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)