X To Launch Television App: लवकरच एलन मस्क लाँच करणार स्वतःचे टीव्ही ॲप; यूट्यूबशी होणार स्पर्धा (Video)

एलोन मस्क लवकरच एक्स टीव्ही ॲप लॉन्च करणार असल्याची बातमी आहे. अशाप्रकारे टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक आता टीव्हीच्या दुनियेतही धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.

X, Elon Musk (PC -Twitter, Wikimedia Commons)

X To Launch Television App: एलोन मस्क त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पूर्णपणे बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही महिन्यात एक्समध्ये अनेक बदल झाल्याचे आपण पहिले. आता एलोन मस्क लवकरच एक्स टीव्ही ॲप लॉन्च करणार असल्याची बातमी आहे. अशाप्रकारे टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक आता टीव्हीच्या दुनियेतही धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत. एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांच्यामते, वापरकर्त्यांना X TV ॲपवर उच्च दर्जाचा कंटेंट मिळेल. या ॲपद्वारे युजर्सना त्यांच्या मोबाईलमधील कंटेंट टीव्हीवर कास्ट करण्याची सुविधाही मिळणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मला मोठी स्पर्धा मिळणार आहे. X TV लाँच केल्यानंतर X सोशल मिडिया TV वर देखील वापरता येईल. एक्सने अद्याप या ॲपच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. पोस्टमध्ये 'लवकरच येत आहे' असे लिहिले आहे. (हेही वाचा: Starlink Internet in India: एलोन मस्ककडून भारतासाठी खास भेट? स्टारलिंक देऊ शकतो देशात स्वस्त इंटरनेट)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement