WhatsApp Banned Indian Accounts: व्हॉट्सअॅपने डिसेंबरमध्ये भारतातील 36 लाखांहून अधिक खराब खात्यांवर घातली बंदी

याआधी कंपनीने सांगितले होते त्यांनी 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान 23,24,000 व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घातली होती.

WhatsApp (PC- Pixabay)

मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपने बुधवारी सांगितले की, नवीन आयटी नियम 2021 चे पालन करत त्यांनी भारतात डिसेंबरमध्ये 36 लाखांहून अधिक वाईट (बनावट) खात्यांवर बंदी घातली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अधिक जबाबदारीने वापरण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याआधी कंपनीने सांगितले होते त्यांनी 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान 23,24,000 व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घातली होती. व्हॉट्सअॅपने नोव्हेंबरमध्ये भारतात 37.16 लाख खात्यांवर बंदी घातली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)