WhatsApp Banned Indian Accounts: यूजर्सच्या सुरक्षेबाबत व्हॉट्सअॅपची मोठी कारवाई; 37 लाख खात्यांवर घातली बंदी
ऑक्टोबरमध्ये व्हॉट्सअॅपने देशातील 23.24 लाख खात्यांवर बंदी घातली होती.
वापरकर्त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने बुधवारी सांगितले की, त्यांनी नोव्हेंबरमध्ये भारतात 37.16 लाख खात्यांवर बंदी घातली आहे. यापैकी जवळजवळ 990,000 खाती अशी आहेत जी, वापरकर्त्यांनी रिपोर्ट करण्याआधीच प्रतिबंधित करण्यात आली. व्हॉट्सअॅपने ऑक्टोबरमध्ये बॅन केलेल्या खात्यापेक्षा हे प्रमाण 60 टक्क्यांनी जास्त आहे. ऑक्टोबरमध्ये व्हॉट्सअॅपने देशातील 23.24 लाख खात्यांवर बंदी घातली होती. व्हॉट्सअॅपने भारताच्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी देशात लागू झालेल्या नवीन आयटी नियमांनुसार, मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला (5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते) दर महिन्याला कंप्लायंस रिपोर्ट प्रकाशित करावा लागतो, ज्यामध्ये त्यांना त्या महिन्यात आलेल्या तक्रारी आणि केलेल्या कारवाईची माहिती द्यावी लागते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)