Twitter Safety Policy: युजर्सच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी प्रतिमा किंवा व्हिडिओ शेअर करण्यावर बंदी; ट्विटरने आणले नवीन सुरक्षा धोरण

काल ट्विटरचे (Twitter) सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी सीटीओ पराग अग्रवाल यांची ट्वीटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती झाली

Twitter (Photo Credits: IANS)

काल ट्विटरचे (Twitter) सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी सीटीओ पराग अग्रवाल यांची ट्वीटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती झाली. आता त्याच्या अवघ्या एक दिवसानंतर ट्विटरने आज सकाळी त्यांच्या खाजगी माहिती सुरक्षा धोरणामध्ये सुधारणा केल्या. त्यानुसार, आता व्यक्तींच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी प्रतिमा किंवा व्हिडिओ शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मने आधीच वापरकर्त्यांना इतरांची वैयक्तिक माहिती जसे की त्यांचा पत्ता किंवा स्थान, ओळख दस्तऐवज, गैर-सार्वजनिक संपर्क माहिती, आर्थिक माहिती किंवा वैद्यकीय डेटा यासारखी वैयक्तिक माहिती शेअर करण्यास प्रतिबंधित केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement