Threat From Chinese Phones: गुप्तचर यंत्रणांचा सीमेवरील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना चिनी मोबाईल फोन न वापरण्याचा सल्ला

एएनआयच्या माहितीनुसार, लष्करी गुप्तचर संस्थांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारताशी शत्रुत्व असलेल्या देशांकडून फोन विकत घेण्यापासून किंवा वापरण्यापासून परावृत्त करण्याच्या गरजेवर भर दिला.

प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा

पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबतचे तणावपूर्ण संबंध असताना, संरक्षण गुप्तचर संस्थांनी सीमेवरील जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चिनी मोबाईल फोन न वापरण्याचा सल्ला दिला आहे. एएनआयच्या माहितीनुसार, लष्करी गुप्तचर संस्थांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारताशी शत्रुत्व असलेल्या देशांकडून फोन विकत घेण्यापासून किंवा वापरण्यापासून परावृत्त करण्याच्या गरजेवर भर दिला. सूत्रांनी सांगितले की, एजन्सींना चिनी मोबाइल फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडल्यामुळे ही सूचना जाहीर करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या चायनीज मोबाईल फोनमध्ये Vivo, Oppo, OnePlus, Honor, Realme, ZTE, Xiaomi, Asus आणि Infinix यांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now