Security Alert For Apple Users: केंद्राने भारतातील ॲपल iPhone, iPad, MacBook वापरकर्त्यांसाठी जारी केला अलर्ट; सायबर हल्ल्याचा धोका

इंडियन कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम (CERT-In) या डिजिटल जगात सुरक्षा सल्ला देणाऱ्या एजन्सीने शुक्रवारी एक अलर्ट जारी केला. हा अलर्ट आयफोन, आयपॅड आणि इतर ॲपल उत्पादनांसाठी आहे.

Cyber Security | Image Used for Representational Purpose (Photo Credits: Pexels)

Security Alert For Apple Users: जर तुम्ही आयफोन, आयपॅड, मॅक युजर असाल तर सावध रहा. सरकारी वेबसाइट Cert-In ने तुमच्यासाठी अलर्ट जारी केला आहे. सायबर स्कॅमर लोकांचा बळी घेण्यासाठी आजकाल अनेक युक्त्या वापरत आहेत. घोटाळेबाज लोकांची फसवणूक करत आहेत. लोकांची उपकरणे हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वेळोवेळी इशारे देत असते. आताही केंद्र सरकारने असाच अलर्ट जारी केला आहे. इंडियन कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम (CERT-In) या डिजिटल जगात सुरक्षा सल्ला देणाऱ्या एजन्सीने शुक्रवारी एक अलर्ट जारी केला. हा अलर्ट आयफोन, आयपॅड आणि इतर ॲपल उत्पादनांसाठी आहे. या उत्पादनांमध्ये अनेक असुरक्षा आढळून आल्या आहेत, जी वापरकर्त्यांसाठी मोठा धोका निर्माण करू शकते. या त्रुटींमुळे सायबर स्कॅमर तुम्हाला बळी बनवू शकतात. जुन्या सॉफ्टवेअर व्हर्जनवर काम करणारी उपकरणे मोठ्या धोक्यात असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले आहे. काही विद्यमान त्रुटींमुळे हॅकर्स केवळ या उपकरणांमध्ये प्रवेशच मिळवू शकत नाहीत, तर ते संवेदनशील माहिती देखील चोरू शकतात. यासाठी ग्राहकांना त्यांची उपकरणे अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा; Digitalisation in India: 'डिजिटायझेशनच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले'; UNGA प्रमुखांनी केले भारताचे कौतुक)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now