ISRO GSLV-F14 Mission: इस्रोच्या नॉटी बॉय रॉकेटच्या मदतीने INSAT-3DS या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
आता यामध्ये हा सातवा उपग्रह जोडला गेला आहे.
इस्रोच्या नॉटी बॉय रॉकेटच्या मदतीने INSAT-3DS या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हा भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे 15 मिनिटांमध्ये इनसॅट-3DS हा उपग्रह आपल्या नियोजित कक्षेत पोहोचवण्यात आला. ज्याप्रमाणे अपेक्षा होती, त्याप्रमाणेच ही मोहीम पार पडली, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली. इनसॅट-3 सीरीजमध्ये आधीपासून सहा वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आहेत. आता यामध्ये हा सातवा उपग्रह जोडला गेला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)